चेन्नई : तामिळनाडूतील एका ठगाने, आपण पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशल असल्याची बतावणी करत एक नव्हे,दोन नव्हे तर चक्क सात महिलांशी विवाह केला. या तोतया पोलिसाला चेन्नई पोलिसांनी अटक केली आहे.
केवळ ७ वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या तिरूपूर येथील राजेश पृथ्वी याने २०१७ मध्ये चेन्नईतील नेल्सन मणिक्कम रोडवर एक टेलिमार्केटिंग कपनी उघडली. तो या कंपनीच्या माध्यमातून लोकांना फोन करून त्यांच्या मुलाला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवत पैसा लुटत असे.

या कामासाठी राजेशने २२ महिलांना नियुक्त केले होते. याच कंपनीच्या माध्यमातून त्याने महिलांना आपल्या जाळ्यात खेचण्यास सुरुवात केली. महिलांना जाळ्यात ओढत असताना, आपला पोलीस वेषातील फोटो दाखवून आपण पोलीस दलात काम करत असताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट होतो; परंतु आता नोकरी सोडली असल्याची बतावणी तो करत असे.
अशाप्रकारे एक-दोन नव्हे,तर चक्क सात महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्याशी विवाहही केले. इतकेच काय यातील सहा महिलांवर त्याने लैंगिक अत्याचार केले असल्याचे उजेडात आले आहे.
तामिळनाडूतील त्रिची, कोईम्बतूर, तिरूपूर, तिरुपती आणि कालाहस्ती येथील अनेक पोलीस ठाण्यांत अशाप्रकारे विवाह करून महिलांची फसवणूक करणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे असे गुन्हे दाखल आहेत
- फक्त भारतच नाही, ‘या’ देशांमध्येही गुंजतो ‘हर हर महादेव’चा जयघोष! जाणून घ्या परदेशातील प्रसिद्ध मंदिरं
- अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा पटसंख्या टिकवण्यासाठी संघर्ष, इंग्रजी शाळांकडे कल वाढल्यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर
- ‘या’ अंकाचे लोक सोन्यासारखं नशिब घेऊन जन्मतात; त्यांची मैत्री म्हणजे करोडपती होण्याची संधी! जाणून घ्या त्यांचे गुण आणि स्वभाव
- अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरण होण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ संघटनेचा इशारा
- अहिल्यानगर जिल्ह्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट, रोडरोमिओंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची पालकांची मागणी