Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

भाजपला शिवसेनालाही संपवायचेय !

पारनेर :- भाजप-सेना युती होणार नसल्याचा दावा करतानाच भाजपला शिवसेनालाही संपवायचे आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केला. भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मिटकरी यांनी सरकारवर टीका केली. अध्यक्षस्थानी माजी आमदार दादा कळमकर होते.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, बाबासाहेब तरटे, अशोक रोहकले, सुदाम पवार, दादा शिंदे, बापू शिर्के, राहुल झावरे, विजय औटी, कारभारी पोटघन, सुरेश धुरपते, सुवर्णा धागडे यांच्यासह या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा, आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रांनाही गर्दी जमा होत नाही इतकी गर्दी लंके यांच्या मेळाव्यास असून त्यांचा विजय आजच निश्चित झाल्याचे सांगून या वेळी बोलताना मिटकरी म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक होत आहे, काळे झेंडे दाखवले जात आहेत. पुरात जनता अडकलेली असताना फडणवीस व ठाकरे हे इन्कमिंगमध्ये व्यस्त होते.

राज्यात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. कारखाने बंंद पडत आहेत, मराठा आरक्षण लागू केले परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत. धनगर, लिंगायतांना आरक्षण नाही, शिवस्मारक, डॉ. आंबेडकरांच्या स्मारकांची कामे झाली नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये या सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे.

जनादेश यात्रेदरम्यान बेरोजगारी, मंदीमुळे बंद पडलेले कारखाने, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार अशा प्रश्नांवर मुख्यमंत्री काहीही बोलत नाहीत. निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्याकडे काहीच मुद्दे नसून काश्मीरमधील ३७० वे कलम पुढे करून ते जनतेला देशभक्ती शिकवत आहेत. तुमच्या रक्तात देशभक्ती मग आम्ही देशद्रोही का? असा सवाल त्यांनी केला.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button