Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात असंतोषाची लाट !

नेवासे :- आगामी विधानसभा निवडणुकीत नेवाशाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपची उमेदवारी दिल्यास ही जागा हातातून जाण्याचा स्पष्ट इशारा तालुक्यातील कार्यकर्त्यानी दिला आहे.

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विरोधात पक्षांतर्गत उठलेली असंतोषाची लाट काही थांबायला तयार नाही. त्यांच्या उमेदवारीविरोधात थेट वरिष्ठांकडे गा-हाणे करण्यात आले आहे.

त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षाची हक्काची जागा जाईल, असे भाजप कार्यकर्त्यांचे मत
असून त्यांना यावेळी विधानसभेचे तिकीट मिळू नये यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावल्याचे समजते.

विशेष म्हणजे आ.बाळासाहेब मुरकुटेंऐवजी सचिन देसर्डा यांना उमेदवारी दिल्यास एकजीवाने काम करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे वचन तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे. 

देशात भाजप निर्विवाद सत्ता राखत असताना नेवासे तालुक्यात नेवासे नगर पंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सह सर्व निवडणुकीत भाजपला अपयश आले.

याला सर्वस्वी आमदार मुरकुटे हेच जबाबदार असून त्यांच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी त्यांनी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचा वापर केला.

तसेच आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेहमी सेटलमेंटचे राजकारण केले असून निष्ठावान कार्यकर्त्यांचा राजकीय बळी त्यांनी दिला. तालुक्याचे पाण्याअभावी वाळवंट त्यांनी जसे केले. तसेच निष्ठावान कार्यकर्ते यांचेही त्यांनी वाळवंट केले.

नेवाशाचे बाळासाहेब मुरकुटे यांना सचिन देसरडा यांचा विरोध सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

त्या वेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या निष्क्रियतेचा पाढाच देसर्डा यांनी वाचला. उमेदवार न बदलल्यास पक्षाला नेवाशाची जागा गमवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

पक्षातील कुरबुरीमुळे आमदार मुरकुटे कमालीचे बॅकफूटवर गेले आहेत. देसर्डा यांच्यासह दिनकर गर्जे, अनिल ताके आदी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आमदार मुरकुटे यांनी तालुक्यात पक्ष व कार्यकर्ते संपविण्याचा विडा उचलल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.

नातेवाइकांसाठीच त्यांनी सत्ता राबवल्याचा आरोप विरोधकांसह कार्यकर्तेही करीत आहेत. या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांच्या विरोधातील नकारात्मक वातावरणाचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button