आमदार संग्राम जगताप व राहुल जगताप राष्ट्रवादी सोडणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर शहरातील विद्यमान आमदार संग्राम जगताप तसेच श्रीगोंदा – नगरचे विद्यमान आमदार राहुल जगताप पक्ष सोडण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत

पक्ष सोडण्यायाबाबत दोन्ही आमदारांनी स्पष्ट भाष्य अद्याप जरी केले नसले तरी त्यांचे निर्णय युती होणार कि नाही ह्या निर्णया नंतर हे दोघे आमदार त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे बोलले जाते.

दरम्यान या दोन्ही आमदारांच्या अधिकृत सोशल मिडीया अकाऊंट्स वर  शेअर करण्यात येणाऱ्या त्यांच्या बाबतच्या पोस्ट मधून मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो आणि चिन्हे दोन्हीही गायब आहेत.

ऐनवेळी पक्ष बदलल्यास अडचण नको म्हणूनच कि काय त्यांनी ज्या राजकीय पक्षाकडून निवडून आले त्याची ओळख असलेले घड्याळ हे चिन्हच गायब केले आहेत.

अहमदनगर लाईव्ह ने याबाबत सत्यता पडताळणी केली असता आ.संग्राम जगताप यांच्या

ह्या https://twitter.com/sangrambhaiya ट्वीटर अकाऊंट वर भेट दिली असता अलीकडील काळात शेअर करण्यात आलेल्या सर्वच पोस्टमधून चिन्ह सोयीस्कररीत्या गायब दिसले,

अर्थात लोकसभा निवडणुकी अगोदरील पोस्टमध्ये राष्ट्रवादीचे लोगो आहेत.

राष्ट्रवादीचे श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप मध्यंतरीच्या काळात सोशल मिडिया पासून चार हात लांबच होते

मात्र निवडणुका जवळ येताच आ.जगताप यांची सोशल मिडीया टीम ॲक्टीव्ह  झाली असून

त्यांच्या समर्थकांकडून शेअर करण्यात येणाऱ्या पोस्टमध्ये ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा लोगो हटविण्यात आला आहे.

यापूर्वी आमदार राहुल जगताप यांच्या सोशल मिडीया अकाऊंट वर मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा लोगो आणि नेत्यांचे फोटोज होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही आमदारांनी एन निवडणुकीच्या काळात सोशल मिडीयावरील आपल्या पक्षाची ओळख का लपविली ?

आणि हा बदल कशामुळे केला हा प्रश्न अनुत्तरीत असून आ.संग्राम जगताप व राहुल जगताप आगामी काळात कोणती भूमिका घेतील याकडे लक्ष राहील.     

शरद पवारांच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार का ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नगर जिल्हा दौर्यावर येणार असून यावेळी हे दोन्ही आमदार उपस्थित रहातात कि नाही हा प्रश्न असून शरद पवार यांचे ही कार्यक्रम टाळणे टाळतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

आणि पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर केली तर ?

दरम्यान आज बीड दौर्यावर असताना शरद पवार यांनी बीडमध्य पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, नगर मध्ये आल्यावर नगर जिल्ह्यातील उमेदवाऱ्या जाहीर करताना ह्या दोन्ही विद्यमान आमदारांच्या उमेदवाऱ्या जाहीर करतात कि नाही ? आणि केल्यास ऐनवेळी काय होणार हा प्रश्नच आहे !

सेना – भाजप युतीवर ठरणार आमदारांचे भवितव्य !

युती झाली तर ह्या दोन्ही आमदारांना राष्ट्रवादी कॉंग्रेस हाच पर्याय असून

युती झाली नाही तर नगर शहरातून आमदार संग्राम जगताप भाजपकडून उमेदवारी करू शकतात, ह्याकामी त्यांना त्यांचे सासरे आमदार शिवाजी कर्डिले मदतीला येत आहेत.

त्याचप्रमाणे श्रीगोंद्यातून आ.राहुल जगताप हे शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवू शकतात ऐनवेळी विखे पाटील यांच्यासह समर्थकांचा छुपा पाठींबा भेटू शकतो.पाचपुते यांचा पराभव करायचा असेल तर हा निर्णय योग्य असल्याचेही आ.जगताप यांचे कार्यकर्ते म्हणतात.

अहमदनगर Live24 वर विधानसभा निवडणुकांचे स्पेशल कव्हरेज / मुलाखती / प्रचार तसेच बातम्या साठी संपर्क 9665762303

Leave a Comment