संगमनेर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाडशी निर्णयामुळेच निळवंडे कालव्यांच्या कामासा सुरुवात झाली. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या स्वप्नपूर्तीचा हा क्षण आहे. जिरायती भागातील शेतकऱ्यांना युती सरकारमुळेच न्याय मिळाला, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.
पानोडी येथे निळवंडे उजव्या कालव्याच्या ५७ किमी लांबीच्या मातीकामाचा प्रारंभ विखे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकेचौरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, अण्णासाहेब भोसले, कैलास तांबे, बाळासाहेब भवर,

सदाशिव थोरात, रामभाऊ भुसाळ, भगवानराव इलग, पोपटराव वाणी, भारत गिते, कांचन मांढरे, सरपंच नंदा जाधव, अशोक तळेकर, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
विखे यांनी निळवंडे कामाच्या वाटचालीचा आढावा घेऊन सांगितले, कालव्यांच्या कामांची सुरुवात ही स्वप्नपूर्ती असली, तरी संघर्षाची भावना विसरता येणार नाही. विखे परिवाराची जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या बदनामीचे कारस्थान कोणी कसे रचले, याकडे दुर्लक्ष करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व विषय समजून घेत या कामाबाबत केलेले निर्णय हे खऱ्या अर्थाने धाडसी असल्याचे त्यांनी सांगितले. अकोले तालुक्यातील कामाबाबत ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी घेतलेला पुढाकार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी निर्णयांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद या मुळे कालव्यांच्या कामातील वास्तव लक्षात आले.
याकडे लक्ष वेधून विखे म्हणाले, अकोल्यात कालव्यांची काम होत नव्हती, पण आंदोलने राहात्यात सुरू होती. आता एकाच वेळी काम सुरू करून निधीची तरतूद सरकारने मोठ्या प्रमाणात केल्याने येत्या दीड वर्षात पाणी देण्याचे उद्दिष्ट असल्याचे विखे म्हणाले.
- महाराष्ट्रातील ‘ह्या’ 3 बड्या बँकांवर आरबीआयची कठोर कारवाई ! ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
- मोठी बातमी ! पुणे – अहिल्यानगर – नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पाचा नवीन डीपीआर तयार ! कसा असणार 235 किलोमीटर लांबीचा नवा रूट ? पहा…
- जपानी लोक इतके शांत आणि यशस्वी का असतात?, नेमकी कशी असते त्यांची ‘शुकन’ लाईफस्टाइल?
- पावसाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात?, मग मोहरीच्या तेलात ‘ही’ एकच गोष्ट मिसळून लावा! त्वरित होईल फायदा
- ‘या’ दोन मूलांकच्या लोकांनी कधीच एकमेकांशी लग्न करू नये, आयुष्य उद्ध्वस्त करून बसाल!