सासरच्या मंडळीकडून जावयास बेदम मारहाण

Published on -

अहमदनगर : तु तुझ्या पत्नीला चांगले वागवत नाहीस. त्यामुळे आम्हाला आमची मुलगी घरी घेवून जायची आहे.त्यास पतीने विरोध केल्याने सासरच्या मंडळींनी लक्ष्मण रामचंद्र ताकवाले (रा. खेंडे, ता. पाथर्डी) यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.

यावेळी भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी आई अलका या मध्ये आल्या असता त्यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी व त्यांची आई दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत ताकवाले यांच्याफिर्यादीवरून शालिनी देवंेद्र थोरात, संदीप थोरात (पूर्ण नाव माहित नाही) चुलत सासरा व अनोळखी इसम (सर्व रा. गेवराई तांडा. जि.औरंगाबाद) यांच्याविरूध्द पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास सफौ.गोल्हार हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!