रोहित पवार मंत्री राम शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्जत – रोहित पवार कर्जत – जामखेड मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्यापासून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांचा चांगलाच धसका घेतला आहे.

राम शिंदे गेल्या १० वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात सर्वात कमी मताधिक्य मिळाले. त्यामुळे शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 

राम शिंदे हे सत्ताधारी असूनही या मतदारसंघात विकास पुरेशी विकास कामे झाले नाही. आज दुष्काळी परिस्थिती आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, याकडे मंत्र्यांनी लक्ष दिले नाही. मतदारसंघातील अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. ही खदखद लोकांच्या मनात आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून रोहित पवार इथे सक्रीय झाले असून थेट जनतेत मिसळत मतदारसंघातील प्रश्न जाणून घेत आहेत.

मतदार संघातील जनतेशी थेट संवाद साधताना ते लोकप्रिय होत आहेत, मंत्री राम शिंदे यांनी सत्ताधारी पक्षात असूनही विकासकामे मार्गी न लावल्याने त्यांचे विरोधक ही पवारांसोबत जात आहेत.

गेल्या काही दिवसांत रोहित पवार यांनी मतदार संघातील आयोजित कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.कर्जत-जामखेड परिसरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या,

तसेच  या मतदार संघातील युवक-युवतींसाठी सृजन फाऊंडेशनमार्फत आयोजित केलेल्या थेट नोकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्यातून कंपन्यांनी 1147 जणांच्या प्राथमिक टप्प्यात निवडी केल्या होत्या.

रोहित पवार यांनी सध्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये अवघ्या काही महिन्यात जबरदस्त पकड मिळविली आहे.

त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढविणार असून

या मतदारसंघात एक अतिशय मोठी चुरस पाहायला मिळू शकते. ह्या लढतीत रोहित पवार मंत्री राम शिंदे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार यात शंका नाही. 

…. लोकसभेच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिलं होतं, आता लक्ष विधानसभा !

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी ही रोहित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. रोहित पवार यांनी देखील तिथे जोमाने प्रचार केला.

याच प्रचारादरम्यान रोहित पवार यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. पण या सगळ्यावर मात करत रोहित यांनी पुन्हा लोकसभेच्या प्रचारात स्वत:ला झोकून दिलं होतं.आता रोहित पवारांचे लक्ष अर्थात विधानसभा असेल…

Leave a Comment