आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी माफी मागावी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नेवासा :- गेल्या ४ वर्षांत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या विरोधात केलेल्या तक्रारींची सखोल चौकशी होऊन त्यात अजिबात तथ्य न आढळल्याने सरकारने देवस्थानाला निर्दोष सिद्ध केल्याचे देवस्थानच्या अध्यक्ष अनिता शेटे यांनी सांगितले.

वैयक्तिक व राजकीय स्वार्थासाठी धादांत खोट्या तक्रारी करून देवस्थानची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून फौजदारीची प्रक्रिया राबवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दानपेटीतील भरणा, पानसनाला सुशोभीकरण, दुष्काळ निवारण निधीत भ्रष्टाचार, मुळा शैक्षणिक संस्थेला १ कोटीची देणगी, बर्फी विक्री, डंपर व जेसीबीचा खासगी वापर, मुळा बाजार खरेदी गैरव्यवहार अशा अनेक तक्रारींची चौकशी होऊन देवस्थानला क्लीन चिट मिळाली असल्याचे शेटे यांनी सांगितले. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे दाखवत विविध चौकशी अहवाल त्यांनी पत्रकारांसमोर सादर केले.

आमदार मुरकुटे यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचना केली होती. त्यात पानसनाला प्रकल्पाच्या एकूण कामास २० कोटी ५१ लाखांची मंजुरी असताना ते काम ५९ कोटींपर्यंत वाढले. दुष्काळ निधीच्या नावाखाली ६ कोटी ७६ लाखांचा कागदोपत्री खर्च दाखवून गैरव्यवहार केला.

दानपेटीतील रकमेचा दररोज भरणा केला जात नाही अशा आशयाच्या त्यांच्या तक्रारी होत्या. धर्मादाय आयुक्तांनी त्रिसदस्यीय समिती नेमून चौकशी केली. यात त्यांना काहीही आढळून आले नसल्याकडे शेटे यांनी लक्ष वेधले.

आमदार मुरकुटे यांनी पुन्हा तक्रार केली. टेंडरपोटी आलेले ७ कोटी गिळंकृत केले, बेकायदेशीर नोकरभरती, पगारवाढ, बर्फी प्रसाद विक्रीत घोटाळा, ४० लाखांची डेंटल वाहन खरेदी करून खोटा लिलाव दाखवून ९० हजाराला विक्री केली,

डंपर व जेसीबीचा खासगी वापर अशा तक्रारींमध्ये कुठलेही तथ्य आढळले नसल्याचा अहवाल मिळाल्याचे शेटे यांनी निदर्शनास आणले. गणेश भगवान वाळुंजकर यांनी बर्फी, प्लास्टिक, तेल विक्री, दानपात्रात गैरव्यवहार, मुळा बाजार खरेदी प्रकरणी गैरव्यवहाराचा दावा करत केलेल्या तक्रारीतही तथ्य नव्हते.

मुरकुटे हे राजकीय फायदा मिळवण्यासाठी देवस्थानला वेठीस धरतात. त्यांच्याच राजकीय दबावातून चौकशा होऊन देवस्थानला ‘क्लीन चिट’ मिळाल्याने त्यावर तरी त्यांचा विश्वास अाहे की नाही हे त्यांनी जाहीर करावे; अन्यथा देवस्थानची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शेटे यांनी केली आहे.


Leave a Comment