Ahmednagar NewsAhmednagar NorthEducational

आदिवासींच्या आरोग्यविषयक संशोधना संदर्भात पहिल्या राष्ट्रीय परिषदचे उद्घाटन संपन्न

प्रवरानगर लोणी :- प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस(अभिमत विद्यापीठ)च्या सेंटर फॉर सोशल मेडिसिन आणि सेंटर फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संशोधन परिषदेचा उद्घाटन सोहळा आज लोणी येथे पद्मश्री डॉक्टर अभय बंग , पद्मश्री डॉक्टर एच सुदर्शन, कुलगुरू डॉ वाय. एम. जयराज, प्र-कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे-पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

आजपासून २१ सप्टेंबरपर्यंत ही परिषद संपन्न होत असून शेवटच्या दिवशी भंडारदरा येथे प्रत्यक्ष आदिवासी भागात भेट देऊन परिसरात राहणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आदिवासींच्या संस्कृती व परंपरां संदर्भात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात मात्र प्रथमच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांचा उहापोह करून त्यावर योग्य उपाययोजना करता याव्यात तसेच शासकीय पातळीवर आदिवासी आरोग्य संदर्भात धोरण निश्चिती करता यावी या उद्देशाने ‘ट्रायबेकॉन’ ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

भारत सरकारचे आदिवासी विकास मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग यांच्या सहकार्याने होत असलेल्या या तीन दिवसीय परिषदेकरिता महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड, पश्चिम बंगाल तसेच पॉन्डीचेरी आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासह एकूण २० राज्यांचे सुमारे तीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून आदिवासी समाजासाठी काम करणारे सुमारे ३० तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेदरम्यान आदिवासी संस्कृती व त्यांच्या पारंपरिक उपचार पद्धतींचे प्रदर्शन यासह सीड मदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या देशी बियाणांचेही प्रदर्शन मांडण्यात आले आहे.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close