कोपरगाव : शहरातील येवला रोडवरील भाच्याने साडीचा पदर ओढून विवाहित मामीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित मामीने भाच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता पती व दोन मुलांसह राहते. तिच्या घराशेजारी भावजय तिच्या मुलासह राहते. बुधवारी (दि. १८) रात्री १०.३० वाजता भाचा दारू पिऊन घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागला.

त्याला समजावून सांगण्यासाठी सदर विवाहिता घराबाहेर गेली असता त्याने मिठी मारून साडीचा पदर ओढून साडी खेचण्याचा प्रयत्न केला. तेथून ती दूर पळाली असता आरोपीने स्वत:च्या अंगावरील सर्व कपडे काढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करू लागला.
याप्रकरणी पीडित महिलेले दिलेल्या फिर्यादीवरून भाच्याविरुद्ध गु. र. नं. ३२३/२०१९ भा. दं. वि. कलम ३५४ (अ), ३५४ (ब), ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- महाराष्ट्राला मिळणार 28 हजार 429 कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर; पुणे अन अहिल्यानगरच्या ‘ह्या’ तालुक्यांमधून जाणार
- Post Office च्या आरडी स्कीममध्ये महिन्याला 2,600 रुपयांची गुंतवणूक केली तर 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार ?
- नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यक मदत लागल्यास तातडीने संपर्क करण्याचे डाॅ. जयश्री थोरात यांचे आवाहन
- जगात पहिल्यांदा जैविक शस्त्र कोणी वापरले?, सध्या कोणत्या देशांकडे आहेत जैविक शस्त्र? धक्कादायक माहिती समोर!
- पंढरीच्या पांडूरंगा कोपरगाव मतदारसंघावर कृपा कर अन् बळीराजाला सुखी ठेव, आमदार आशुतोष काळे यांचे विठ्ठलाकडे साकडे