कर्जत-जामखेडच्या विकासासाठी ‘रोहित पॅटर्न !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

‘कर्जत-जामखेड परिसरातील मतदारांचा केवळ निवडणुकीत मतदानापुरताच वापर करण्यात आला. मात्र, आपण परिसरातील विकासासाठी दृष्टिकोन विकसित करीत आहोत.

त्यादृष्टीनेच शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित केले जात आहेत. कमी पाण्यामध्ये शेती, मधुमक्षिकापालन, कुक्कुटपालन यांसारखे प्रयोग शेतकऱ्यांना माहीत व्हावेत, तसेच लोकांच्या हाताला काम आणि रोजगाराच्या नवीन संधी, हेच आपले विकासाचे व्हिजन आहे.

परिसरातील तलावांमध्ये साठलेला गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल. तुकाई योजना मार्गी लावताना चारी पद्धतीने असलेली जुनी योजना मार्गी लावणार आहे,’’ असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, स्वतः रोहित पवार यांनी आपण कर्जत-जामखेडमधून विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. तसंच, आपण का हे क्षेत्र मागतोय या मागचे कारण सांगताना ते म्हणाले, कोणतेही क्षेत्र निवडताना तेथील आव्हानांचा अभ्यास करणं गरजेचं असतं,

या क्षेत्रातून निवडून येण्यासाठी सोपे म्हणून त्या भागाचा विचार न करता जेथे काम करण्यास अधिक वाव आहे तेथून मला विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा असल्याचे ते म्हणाले होते.

कर्जत-जामखेडमध्ये कामासाठी अधिक वाव आहे. इथल्या तरुण वर्गासाठी, वंचित शेतकरी घटकासाठी आव्हानात्मक कामाची यादीच आपण काढलेली असल्याचेही त्यांनी या आधी सांगितले होते.जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गटारे नाहीत. अशी परिस्थिती आहे

या भागातील प्रश्न सोडवायचे आहेत. शिक्षण, रोजगारा बरोबरच सर्वात जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न पुढील काळात कायमचा सोडवला जाईल.आणि सर्वात विकसित मतदारसंघ म्हणून कर्जत-जामखेडची वेगळी ओळख निर्माण होईल….

Leave a Comment