Ahmednagar NewsBreaking

ट्रक चालकास भरदिवसा लुटले

अहमदनगर : नगर पाथर्डी रोडवरील पाथर्डी तालुक्यातील वाळुंज शिवारात महिंद्रा ट्रॅक्टर शोरूमजवळ पुण्याकडे जाणाऱ्या ट्रक चालकास रस्त्यात अडवून त्याच्याकडील ४५ हजार ५०० रूपये व ट्रकमधील ३०० लिटर डीझेल असा ऐवज लुटला आहे.

ही घटना मंगळवार दि.१७ सप्टेबर रोजी घडली. याप्रकरणी ट्रकचालक बबन मधुकर सोनवणे रा.बाभळगाव ता.माजलगाव याच्या फियादीवरून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात पाच चोरट्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर असे की, बबन सोनवणे हे क्र.एमएच १२ एलटी १९४० या क्रमांकाच्या ट्रकमधून दि.१७ सप्टेबर रोजी परळीहून पुण्याकडे कोळशाची राख घेवून जात होते.ते सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाळुंज गावच्या शिवारात आले असता.

दिपाली हॉटेल जवळ सोनवणे यांच्या ट्रकला अज्ञात कारचालकाने पांढऱ्या रंगाची व्हीस्टा गाडी तर महिंद्रा शोरूमजवळ पल्सर मोटारसायकल एमएच १६ सीएम ४५५९ ही आडवी लावून क्लिनरला या मोटारसायकलवर बसवून पाथर्डी बससथानकावर नेले व तेथे त्याच्याकडील रोख रक्कम व ट्रकमधील ३०० लिटर डिझल बळजबरीने चोरून नेले आहे.

याप्रकरणी ट्रक चालक बबन मधुकर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात पाच चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केल आहे. याबाबत अधिक तपास सपोनि राठोड हे करत आहेत.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button