अहमदनगर :- राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर येथे शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर कार्यक्रमस्थळावरुन बाहेर पडताना राष्टवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांना काही कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा ताफा जात असतांनाच माजी महापौर अभिषेक कळमकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे यांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर चपला फेकण्यात आल्याचे समोर आले. आमदार संग्राम जगताप यांच्यासमोरच हा प्रकार घडला. या प्रकारामुळे येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला, तर जगताप समर्थकाकडून कळमकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान काळे यांनी हा प्रकार जगताप समर्थकांनी केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी कळमकर हे कोतवाली पोलीस ठाण्यात गेले आहेत. या घटनेमुळे नगर शहरातील राष्टवादी काँग्रेसमध्ये कळमकर-जगताप गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
- सलमान खान-संजय दत्तमुळे बनलं एका फ्लॉप अभिनेत्याचं करिअर, 2004 चा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट तुम्ही पाहिलाय का? वाचा पडद्यामागील कहाणी
- महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-6 खेळाडूंची यादी, नंबर-1 वर भारताची झुलन गोस्वामी!
- फक्त ₹200 मध्ये कॉलिंग, डेटा, OTT अॅक्सेस आणि बरंच काही; Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट बजेट फ्रेंडली प्लॅन!
- ‘या’ 10 सवयी आत्ताच बदला, अन्यथा तुमचा फ्रीजच बनू शकतो टाइम बॉम्ब! एका झटक्यात घर जळून खाक होईल
- नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? ‘या’ सरकारी स्कीम्स देतील 10 लाखांपासून 10 कोटींपर्यंत लोन; जाणून घ्या संपूर्ण माहिती!