Maharashtra

कोपरगावात कांद्याला ६३४० रुपये भाव

कोपरगाव | येथील बाजार समितीत डाळिंब व कांद्याचे लिलाव दररोज चालू आहेत. कांद्याचा खुला लिलाव सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे.

शुक्रवारी कांद्याला क्विंटलला ६३४० रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे व उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली.

नंबर १ ला चार ते पाच हजार, गोल्टीला तीन ते साडेतीन हजार भाव मिळाला. डाळिंबाच्या १८० कॅरेटची आवक झाली.

प्रति कॅरेट (२० किलो) भाव असे – नंबर १ दीड हजार ते दोन हजार नऊशे, नंबर २ पाचशे ते चौदाशे, नंबर ३ शंभर ते साडेचारशे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button