Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

रस्ता ग्रामीण भागात महत्त्वाचा घटक : आ.जगताप

श्रीगोंदा : ग्रामीण भागातील जनतेसाठी रस्ता हा महत्वाचा घटक आहे. रस्ता चांगला असेल तर आपला शेतीमाल वेळेत बाजारपेठेत पोहचवणे त्यांना सहज शक्य होते. वेळेत माल पोहचविला तर बाजारभाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे रस्ता हा विकासाच्या दृष्टीने महत्वाचा घटक आहे. असे मत आमदार राहुल जगताप यांनी व्यक्त केले.

कोळगाव ते गुंडेगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.यावेळी जगताप बोलत होते. ते म्हणाले की, मतदार संघातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रथम प्राधान्याने काम करण्यावर माझा भर आहे. परंतु मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची अतिशय दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे रस्ता नसताना देखील वेगवेगळ्या विभागामार्फत पाठपुरावठा करून निधी उपलब्ध करून काम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

सामाजिक कार्यकर्ते भापकर गुरुजी यांनी आ.जगताप यांचे गुंडेगाव, कोळगाव मानमोडी तसेच जगताप वस्ती येथील ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले. यावेळी माजी जि परिषद सदस्य हेमंत नलगे, भापकर गुरुजी,संतोष लगड, विश्वास थोरात,

विनायक लगड, धोंडिबा लगड, वर्षा काळे, विलास शितोळे, सुभाष लगड, गोरख घोंडगे, सुयश जाधव, दिलीप शिंदे, अमोल भापकर, नितीन डुबल, बापू जगताप, बाळासाहेब जगताप, बंडू कवडे, बाळासाहेब लगड, बन्सी लगड, राजू गवळी,

सोमनाथ लगड, ज्ञानदेव लगड, कैलास जगताप, दामुकाक साके, जालिंदर जगताप, दादासाहेब निरफळ, संजय लगड, आबा गुंजाळ तसेच मानमोडी, जगताप मळा, बेंदमळा तसेच कोळगाव पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button