सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्ण मंदावल्यामुळे धरणाच्या दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी शनिवारी बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणात शनिवारी सायंकाळी १०४.८१ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्यापैकी उपयुक्त साठा ९९.९२ टीएमसी आहे. शुक्रवारी धरणाचे सहापैकी दोन दरवाजे एक फुटांनी वर उचलून त्यातून विनावापर पुर्वेकडे पाणी सोडण्यात येत होते.

परंतु पाऊस मंदावला असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाल्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आता धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आणि विसर्ग २१०० क्युसेक ठेवण्यात आला आहे. धरणातील पाणीपातळी २१६३.०२ फूट झाली आहे. दिवसभरात कोयनानगर १ एकुण ६९२७, नवजा ४ एकूण ८०५७ आणि महाबळेश्वर येथे ६ एकूण ६९९२ मि. मी. पावसाची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे.
- जामखेड तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड सागर मोहोळकरची पोलिस बंदोबस्तात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी
- अहिल्यानगर शहरात मोहरमची विसर्जन मिरवणूक पडली शांततेत पार, ‘लब्बैक या हुसेन… या हुसेन’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला
- DMart मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त आणखी कोणकोणते लाभ मिळतात?
- ‘हे’ आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुस्लिम उद्योगपती ! दररोज 2700000000 रुपये दान करतात
- 100 वर्षानंतर घडली एक अद्भुत घटना, 7 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश !