मोटारसायकल घसरून पडल्याने एकाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : भरधाव वेगातील मोटारसायकल घसरून पडल्याने मोटारसायकलस्वार अविनाश अप्पा गिरी (वय २८ रा.हंगा ता.पारनेर) या युवकाचा मृत्यू झाला.

ही घटना १३ सप्टेंबर रोजी नगर पुणे महामार्गावर सुपा गावच्या शिवारारत काळूबाई हॉटेल समोर घडला. . याबाबत सविस्तर असे की, अविनाश गिरी हा नगर पुणे महामार्गावरून जात असताना तो सुपा गावच्या शिवारातील काळूबाई हॉटेलच्या शिवारात आला असता.

वेगात असलेली त्याची मोटारसायकल (एमएच १६ बीई ९८२५) घसरून पडली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

त्याला उपचारासाठी पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत प्रमोद तात्याभाऊ गिरी यांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Leave a Comment