…या कारणामुळे महिलेचे रक्त झाले निळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

न्यूयॉर्क : प्रत्येक व्यक्तीचे रंगरूप व अंगकाठी भलेही वेगवेगळी असली तरी प्रत्येकाच्या रक्ताचा रंग लालच असतो. मात्र अमेरिकेतील एका महिलेच्या रक्ताचा रंग चक्क निळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका औषधाच्या दुष्परिणामामुळे असे झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अध्ययनात डॉक्टरांनी ही माहिती दिली.. ही २५ वर्षीय महिला अमेरिकेच्या ऱ्होड आयर्लंडमधील प्रोव्हिडन्स शहरातील राहणारी आहे.

काही दिवसांपूर्वी तिला अचनाक अशक्तपणा, थकवा, धाप लागणे यांसारखा त्रास होऊ लागल्यानंतर ताबडतोब आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. तिथे तिची रक्ताची तपासणी करत असताना तिच्या रक्ताचा रंग निळा झाला असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. विशेष म्हणजे या महिलेचे संपूर्ण शरीरच निळे पडले होते.

ही घटना घडण्याच्या आदल्या रात्री या महिलेने दात दुखत असल्याने एक औषध जास्त प्रमाणात घेतले होते. त्यामुळेच ही समस्या निर्माण झाला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. आाणखी तपासणीमध्ये रक्ताचा रंग आणि शरीर निळे पडण्याला वैद्यकीय भाषेत ‘सायनेटिक’ असे नाव असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Comment