Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtra

तरुणाईचे मतदान ठरवेल नगर जिल्ह्यातील आमदार !

अहमदनगर :- जिल्ह्यातील राजकारण घराणेशाही पद्धतीचे असून त्याच त्या नेत्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणातील विविध पदांवर संधी मिळत असते. या नेत्यांचा हक्काच मतदार असल्याचे मानले जाते.

विविध माध्यमांतून नेत्यांशी, त्यांच्या संस्थांशी बांधली गेलेली ही मंडळी आपल्या नेत्यांकडे पाहूनच मतदान करीत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे येथील निवडणूक लढविण्याची पद्धत, प्रचाराची पद्धतही त्यानुसार आखलेली होती.

अलीकडे मात्र मतदारांमध्ये तरुणाईची संख्या वाढत आहे. आता ते प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे नेत्यांनाही आपल्या पद्धतीत बदल करणे भाग पडत असल्याचे दिसून येते.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदार यादीमध्ये १८ लाख ५ हजार ५२६ पुरुष, १६ लाख ६२ हजार ८३४ महिला व १६२ इतर असे एकूण ३४ लाख ६८ हजार ५२२ मतदार आहेत. यामध्ये तब्बल ४५ टक्के मतदार हे वय वर्ष चाळीशीच्या आतमधील आहेत.

जिल्ह्यातील बारा मतदारसंघामध्ये मिळून १८ ते १९ या वयोगटातील ८० हजार ३८ मतदार आहेत. हे सर्व मतदार विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

वयोगटानुसार असे आहेत मतदार :

१८ ते १९ वयोगट : ८० हजार ३८

२० ते २९ वयोगट : ७ लाख १० हजार ६८५

३० ते ३९ वयोगट : ७ लाख ७० हजार ४१०

४० ते ४९ वयोगट : ७ लाख १९ हजार ७४०

५० ते ५९ वयोगट : ५ लाख ३२ हजार ९८८

६० ते ६९ वयोगट : ३ लाख ४० हजार ७१४

७० ते ७९ वयोगट : २ लाख १ हजार ५६२

८० ते ८९ वयोगट : ९४ हजार ६३५

९० ते ९९ वयोगट : १५ हजार ८४८

वय वर्ष ९९ च्या पुढील मतदार : १ हजार ९०२

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button