अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १२ मतदारसंघांसाठीची अधिसूचना शुक्रवारी जारी होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येतील.
उमेदवाराला किंवा त्याच्या सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सार्वजनिक सुटी व्यतिरिक्त सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करता येईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर आहे.

आचारसंहिता कालावधीत सण व उत्सव आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी दक्ष रहावे. बंदोबस्तासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास अगोदरच कळवा,
अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मेहता यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरण्याची अंतिम मुदत – ४ ऑक्टोबर अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर अर्ज माघार – ७ ऑक्टोबर मतदान – २१ ऑक्टोबर मतमोजणी – २४ ऑक्टोबर.
- बँकेपेक्षा जास्त परतावा देतो” म्हणत शेअर मार्केटच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक
- शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळणे अभिमानास्पद ! मंत्री विखे पाटील यांचे गौरवोद्गार
- खाटूश्याम आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! 14 जुलैपासून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?
- निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सुटणार : आ. कर्डिले
- जिथे रावणाचे विचार होते तिथे वारकऱ्यांमुळे प्रभू रामांच्या विचारांची पेरणी : आमदार डॉ. किरण लहामटे