राहुरी : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ‘वेक अप महाराष्ट्र’ नावाने उपक्रम चालू केला.
यातील एक भाग ‘मै भी नायक’ या स्पर्धेत राहुरी तालुक्यातील गुहा येथील अजिंक्य दिलीप बोरुडे हा विजेता ठरला. त्याला दोन दिवस पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्यासोबत राहून मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला.

सत्यजित तांबे यांनी ‘वेक अप महाराष्ट्र’ नावाने उपक्रम चालू केला. त्यात विविध प्रकारचे उपक्रम राबविले. त्यात ‘टिक टॉक’, ‘मै भी नायक’, ‘युवकांच्या स्वप्नातील महाराष्ट्र’, असे उपक्रम राबविण्यात आले. ‘मै भी नायक’ स्पर्धा ही विविध टप्यात घेण्यात आली व हजारो युवकांनी त्यात सहभाग घेतला.
प्रथम युवकांकडून आपल्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असावा याचे व्हिडीओद्वारे मत मागविण्यात आले. त्यातील उत्कृष्ट ७५० स्पर्धक निवडून ऑडिशनद्वारे ६५ स्पर्धांना मुंबईत अंतिम फेरीसाठी निवडले व त्यामधून टॉप २० निवडून संपूर्ण महाराष्ट्रातून ऑनलाइन मतदान घेण्यात आले.
यामधून १२ जणांना एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला. अजिंक्य बोरुडे हा ग्रामीण भागीतील तसेच नगर जिल्ह्यातील एकमेव विजेता आहे. तसेच बी. ई. सिव्हील इंजिनिअर आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राजेंद्र बोरुडे यांचा भाऊ आहे. शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपले मत मांडून सर्धेत विजय मिळविला.
गुरुवार दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांच्यासोबत राहून मुख्यमंत्र्यांचे कामकाज समजून घेऊन शेतीसाठी नवीन उपाययोजना तसेच उपक्रम यावर चर्चा केली. तसेच पंजाबमधील अनेक मंत्र्यांच्या भेटी घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अमरिंदरसिंह राजा यांच्यासोबत युवकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. पंजाबमधील विविध भागाला तसेच तेथील शेतकऱ्यांना भेटून तेथील नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतली.
नायक चित्रपटाप्रमाणे ग्रामीण भागातील एका युवकाला एक दिवस मुख्यमंत्री बनण्याची संधी चित्रपटात नाही, तर प्रत्यक्षात दिल्याने त्याने तांबे यांचे आभार मानले. युवक व शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहण्याचा मनोदय व्यक्त केला
- Bank of Baroda LBO Jobs 2025: बँक ऑफ बडोदा मध्ये मेगाभरती! LBO पदाच्या 2500 जागांसाठी भरती सुरू
- महाभयंकर प्रलयानंतरही ‘हे’ शहर किंचितही हलणार नाही, भगवान शंकराच्या प्रिय नगरीचं रहस्य तुम्हाला थक्क करेल!
- वाहन चालकांसाठी गुड न्यूज! ‘या’ राष्ट्रीय महामार्गांवरील टोल थेट अर्ध्यावर, सरकारकडून 50% कपातीची घोषणा
- काय सांगता ! ‘ही’ सोपी ट्रिक वापरून तुम्ही साप विषारी आहे की बिनविषारी हे ओळखू शकता
- अवघ्या 65 दिवसांत घटवलं 11 किलो वजन, कपिल शर्माचं फिटनेस सिक्रेट उघड! जाणून घ्या 21-21-21 फॉर्म्युला