पारनेर: तालुक्यातील पुणे – नगर महामार्गावर पळवे शिवारात दि.२६ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास हॉटेल धनश्री हॉटेल समोर उभ्या असलेल्या कंटेनर (क्र.एम.एच. ४६ बी.बी.२५६४) ला पुण्याकडून नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टेम्पो (क्रं.एम.एच१२ एफ.झेड.७९८६) ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने टेम्पो चालक जागीच ठार झाला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पळवे शिवारातील हॉटेल धनश्री समोर रस्त्याच्या साईड पट्टीवर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या कंटेनरला टेम्पोने पाठीमागून जोराची धडक दिली.

त्यावेळी पाऊस चालू असल्याने उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज न आल्याने कंटेनरवर धडकल्याने त्यात टेम्पो चालक शरद वामनराव पाईकराव (वय -४५ रा सातार माळ ता. पुसद. जि. यवतमाळ) हा ठार झाला तर त्यासोबत असणारा एक जण जखमी झाला.
त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब बबन पारखे रा.वाघुंडे खुर्द यांच्या फिर्यादी वरून सुपा पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- ‘या’ जमातीतील विचित्र रिवाज पाहून अंगावर शहारे येतील; मृतदेहांसोबत राहतात जिवंत लोक, दरवर्षी त्यांना नव्या कपड्यांत गावभर फिरवतात अन्…
- ‘या’ अभिनेत्रीमुळे अनिल कपूरचं वैवाहिक आयुष्य आलं होतं धोक्यात, दोन मिनिटांच्या न्यूड सीनने बॉलीवूडलाही हादरून सोडलं!
- सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 6 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ?
- शिर्डीत ‘पैसे डबल’चा स्कॅम ! आरोपी निघाला सराईत गुन्हेगार; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले
- महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना दिलासा ! ‘ह्या’ प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ, 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही