Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

रोहित पवारांचे डिपाॅझिट जप्त करून बदला घेणार !

जामखेड :- बारामतीची शिकार हातातून जाते काय असे वाटते, परंतु ही शिकार आपल्या हातूनच व्हावी, अशी इच्छा आहे, असे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी पवार यांचे डिपाॅझिट जप्त करून घेणार आहे, असेही ते म्हणाले.

सरपंच परिषद महामेळाव्यात शिंदे बोलत होते. सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सारोळ्याचे सरपंच अजय काशीद यांनी या मेळाव्याचे आयोजन केले. या वेळी जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजप तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, काशीनाथ ओमासे, विलास मोरे, हनुमंत उतेकर, काकासाहेब चव्हाण, कृष्णा चव्हाण, नंदू गोरे, गणेश लटके, दादासाहेब वारे,

महारूद्र महारनवर, हरिभाऊ मुरूमकर, गफ्फार पठाण, भारत उगले, केशव वनवे, डॉ. गणेश जगताप, लहू शिंदे, बापूराव ढवळे, विद्या मोहळकर, गणेश कोल्हे, सुखदेव शिंदे, प्रशांत शिंदे, विठ्ठलराव राऊत, अॅड. प्रवीण सानप, नगरसेवक महेश निमोणकर, राजेश वाव्हळ, बिभिषण धनवडे, संतोष गव्हाळे, भाजप शहराध्यक्ष सोमनाथ राळेभात, पांडुरंग उबाळे, मनोज कुलकर्णी, ज्ञानेश्वर झेंडे आदी उपस्थित होते.

कोट्यवधींचा निधी आणल्यामुळे जनता आता विकासाची फळे चाखू लागली आहे. पुढील पाच वर्षांत कृष्णा भीमा स्थिरीकरण पाणी योजना आणून मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् करणार आहे, असे सांगून शिंदे म्हणाले, आम्ही कोट्यवधींचा निधी आणला, परंतु जाहिरात केली नाही.

विरोधक मात्र चाॅकलेट-गोळ्या वाटतात, पण त्यावर स्वतःचा फोटो छापतात. विरोधात उभा करण्यासाठी एकही माणूस मिळाला नाही. त्यामुळे बाहेरून माणसे आणावी लागत आहेत. तथापि, जनता स्वाभिमानी आहे. बाहेरचे पार्सल ते बाहेरच पाठवतील. बारामतीकरांनी गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यभर त्रास दिला, त्याचा बदला मी घेणार आहे. विरोधात कोणीही उभे राहिले, तरी मी ते सावज टिपेन, असे शिंदे यांनी सांगितले.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close