Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

पालकमंत्री ना.राम शिंदेंकडून पवारांना जोरदार राजकिय धक्का

कर्जत: तालुक्यातील शेगूड येथे ना. प्रा राम शिंदे यांनी राज़कीय खेळी करून पाच दिवसांपूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांची घरवापसी करवून घेतली. शेगूड येथे ना. शिंदे यांच्या सभेत अनेकांची भाषणे झाली.

त्यानंतर उपनगराध्यक्ष नामदेवराव राऊत हे अचानक जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांना घेऊन दाखल झाले. हे पाहून उपस्थितांना धक्काच बसला. भाजपाचे जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी पासच दिवसांपूर्वी कर्जत येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

मात्र, आज ना. शिंदेंनी आपला मास्टरस्ट्रोक मारत आव्हाड यांची घरवापसी करवून घेतली. या वेळी पालकमंत्री ना. शिंदे यांनी, भाजपचा पंचा घालून पक्षाचा झेंडा आव्हाड यांच्या हातात दिला. या वेळी भाजपाचे कर्जत तालुकाध्यक्ष अशोकराव खेडकर, जामखेड भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, भगवान मुरूमकर, अंगद रुपनर, मनोज कुलकर्णी,

नगराध्यक्ष निखिल घायतडक, सोमनाथ पाचर्णे, डॉ.पवार, ॲड. बाळासाहेब शिंदे, आबा डमरे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष अजय काशीद, मार्केट कमिटीचे उपसभापती प्रकाश शिंदे, विलास मोरे, महेश जगताप, संदीप शेगडे, सुनील यादव, डॉ. नितीन तोरडमल, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आजच्या या घरवापसीने कर्जत पंचायत समितीच्या सभापती पदावेळी झालेल्या नाटयाची पुनरावृर्ती यानिमित्ताने पुन्हा पहावयास मिळाली, त्यावेळी कर्जतच्या सभापती साधना कदम या भाजपाकडून सभापती झाल्या व लगेच राष्ट्रवादीच्या गोटात गेल्या होत्या मात्र दोन दिवसांनी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण भाजपाच्या सभापती म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले होते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button