मुंबई: भाजप आणि शिवसेनेने एक संयुक्त पत्रक काढून अखेर आज युतीची घोषणा केली आहे. या पत्रकात भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष हे महायुती म्हणून लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे
फॉर्म्युल्याविषयीचा तपशील हा लवकरच जाहीर करण्यात येईल असं या पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे जरी युती झाली असली तरी भाजप-शिवसेनेचा फॉर्म्युला हा गुलदस्त्याच ठेवण्यात आला आहे .


या पत्रकावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देशमुख यांची सही आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्ष विधानसभेत एकत्रितरित्या निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.
दरम्यान चंद्रकांत पाटलांनी असंही म्हटलं की, ‘शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत काहीही ठरलेलं नाही.’ युतीचा फॉर्म्युला आणि उपमुख्यमंत्रीपद याबाबत शेवटपर्यंत दोन्ही पक्षांकडून बरीच गुप्तता पाळण्यात येत आहे.
- घरात वारंवार आजारपण येत असेल, तर लगेच करा ‘हा’ वास्तू उपाय!
- 12GB रॅम, 5000mAh बॅटरी आणि 90 Hz डिस्प्ले! अवघ्या ₹6,549 मध्ये मिळतोय iPhone लूक असलेला स्मार्टफोन
- कडक चहा हवा, म्हणून तुम्हीही चहा जास्त वेळ उकळता? मग ही बातमी वाचाच!
- UIDAI चा नवा नियम! 3 वर्षे वापर नसेल तर आधार डिअॅक्टिवेट होईल, पुन्हा अॅक्टिव करायचं असेल तर? जाणून घ्या प्रोसेस
- भारताचे पहिले ISS अंतराळवीर शुभांशू शुक्लाची एकूण नेट वर्थ किती?, आकडा आला समोर!