विधानसभेच्या आखाड्यात मनसे उतरणार, पहिला उमेदवारही जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन, उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली. सर्वच पक्षांची लगबग सुरु झाली आहे, तर एक पाऊल पुढे जात काँग्रेस-राष्ट्रवादीने आपले काही उमेदवारही जाहीर केलेत. 

राज ठाकरेंची मनसे निवडणूक लढवणार की नाही? याबाबत काहीही स्पष्ट होत नव्हतं. मात्र राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं आज स्पष्ट केलं आणि हळूहळू सगळं सागंणार असंही सांगितलं.

मुंबईतल्या वांद्र्यातील एमआयजी क्लब येथे मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मनसे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच येत्या 5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. 

मात्र ही प्रचारसभा कुठे असणार याची कोणतीही माहिती राज ठाकरेंनी दिली नाही. मनसे विधानसभेच्या किती जागा लढवणार याचीही काही माहिती राज ठाकरेंनी देणं टाळलं. 5 तारखेला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

मंत्रालयात आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी आज मनसेमध्ये प्रवेश केला. नरेंद्र पाटील मनसेकडून निवडणूक लढणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं. 

याशिवाय नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले असून ते देखील निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं.

Leave a Comment