अंबाजी : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात सोमवारी एक खासगी प्रवासी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात २१ ठार, तर ५० जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पंतप्रधानांनी या अपघातावर शोक व्यक्त केला.. बसमधील सर्वजण अंबाजी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या बसमध्ये सुमारे ७० भाविक होते. दर्शनावरून परतत असताना अंबाजी-दांता मार्गावरील त्रिशुलिया घाटात ही ट्रॅव्हल्स उलटली. हा अपघात एवढा भीषण होता २१ जण जागीच ठार झाले. उर्वरित सर्व ५० जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील गावकरी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या मदतीने बस सरळ करून त्यामधून अडकलेल्या लोकांना बाहेर काढावे लागले. अपघातस्थळी रक्त, मांसाचा अक्षरश: सडा पडला होता. पावसामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. या अपघाताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. पावसामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
- महाराष्ट्रातील ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांना वयाच्या 50/55 व्या वर्षी सक्तीची निवृत्ती दिली जाणार ? ह्या विभागाचा नवा जीआर
- अहिल्यानगरच्या भाजीपाला बाजारात वांगे, कारल्याला ८ हजारांपर्यंत दर, बाजारात २३०२ क्विंटल भाजीपाल्याची आवक
- अहिल्यानगर जिल्हा कृषी क्षेत्रात अन् दुधाच्या उत्पादनात राज्यात आघाडीवर- जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया
- 3 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब बदलणार ! नशिबाच्या साथीने मिळणार जबरदस्त यश
- शनैश्वर देवस्थान घोटाळ्याची धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार, विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करण्याची मागणी