नेवासे :- भाजपच्या पहिल्याच यादीत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव जाहीर होताच नेवासे तालुक्यातील अनेक गावांत भाजप, सेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला.
मुरकुटे यांनी फेरी काढत देवदर्शन घेतले. भाजपची उमेदवारी म्हणजे विजय निश्चित, अशी परिस्थिती असताना नेवासे तालुक्यात संदिग्ध वातावरण होते.

आमदार मुरकुटे यांना नाकारत भाजपचे तिकीट बदलले जाणार, नेवासे मतदारसंघ शिवसेनेला सोडणार अशा बातम्यांनी भाजप व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांत, तसेच मतदारांमध्येही संभ्रम निर्माण केला होता.
तथापि, आमदार मुरकुटे हे उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत होते. मंगळवारी भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत मुरकुटे यांचे नाव जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.
उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार मुरकुटे यांनी नेवासे तालुक्याचे दैवत असलेल्या देवगडच्या दत्तात्रेयांचे दर्शन घेतले, तसेच शनिशिंगणापूरला जाऊन अभिषेक केला. त्यानंतर नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिरातील पैसचे, ग्रामदैवत मोहिनीराज व बेलपिंपळगावच्या जागृत मारूतीचे दर्शन घेतले.
- अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचा पटसंख्या टिकवण्यासाठी संघर्ष, इंग्रजी शाळांकडे कल वाढल्यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर
- ‘या’ अंकाचे लोक सोन्यासारखं नशिब घेऊन जन्मतात; त्यांची मैत्री म्हणजे करोडपती होण्याची संधी! जाणून घ्या त्यांचे गुण आणि स्वभाव
- अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरण होण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ संघटनेचा इशारा
- अहिल्यानगर जिल्ह्यातील जेऊर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट, रोडरोमिओंचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची पालकांची मागणी
- श्रीगोंदा पोलिसांचा साठवणूक करून ठेवलेल्या अवैध गुटख्यावर छापा, ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त तर दोघांवर गुन्हा दाखल