पारनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच अपक्ष म्हणून नीलेश लंके यांनी दोन उमेदवारी अर्ज निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी निवडणूक अधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे दाखल केले.
निलेश लंके यांनी गेल्या महिन्यात आ.विजय औटी यांच्या विरोधात बोलताना ‘मी फकीर आहे, माझे बँकेत खाते ही नसल्याचे वक्तव्य केले होते, मात्र निवडणूक अर्ज भरल्यानंतर त्यांची खरी संपत्ती समोर आली आहे.

लंके यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे ५८ लाख ५६ हजार ५२१ रुपयांची जंगम, तर १५ लाख ३५ हजार १५३ रुपयांची स्थावर मालमत्ता असून ३२ लाख २८ हजार ९८९ रुपयांचे कर्ज आहे. लंके यांच्याकडे ५० हजार रुपये रोख.
१३ हजार ९७७ रुपयांच्या ठेवी व शेअर्स, १७ लाख ३ हजार ६८८ रुपयांची बस, २६ लाख ७५ हजार ९३६ रूपयांची कार, १३ लाख २२ हजार २६० रुपयांची बस, ७ हजार १०० रुपयांची दुचाकी, ७६ हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या आहेत.
त्यांच्या पत्नी जि. प. सदस्या राणी लंके यांच्याकडे ४० हजार रोख, ४ हजार ७३५ रुपयांच्या ठेवी, १ लाख १४ हजारांचे सोन्याचे दागिने आहेत. नीलेश यांच्याकडे १५ लाख ३५ हजारांची स्थावर मालमत्ता आहे.
- तिसगावकरांची ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी फरफट, आठ दिवसाला नागरिकांना पाणी मिळणार
- गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, राहुरीत ख्रिश्चन समाज आक्रमक! हजारोंचा मोर्चा
- संगमनेरमध्ये व्याजाचे पैसे न दिल्याने पती-पत्नीला धमकी, दोन सावकारांना संगमनेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- तुमच्या घराची लक्ष्मी तुम्हाला बनवणार लखपती ! पत्नीसोबत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये गुंतवणूक करा, महिन्याला मिळवा 9,000 रुपयांचे उत्पन्न
- Bank Of Baroda मध्ये 2,00,000 रुपये जमा करा, 47,000 रुपयांचे व्याज मिळणार ! ‘ही’ योजना ठरणार फायदेशीर