मुंबई : बेरोजगारी हा सामाजिक प्रश्न असून युवकांची होणारी सामाजिक कुचंबना, महागाई, वाढीव शुल्क यामुळे पालकांवरील अवलंबित्व लक्षात घेता, राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळण्याच्या किमान 02 वर्षेपर्यंत दरमहा 5000 रु. बेरोजगार भत्ता देण्याचे आमच्या सरकारचे धोरण असेल असेही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
सरकारी पद भरतीचा विषय राज्यभर तापलेला असताना, सरकारबद्दल विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्र युवक कॉंग्रेसने आपल्या स्वतंत्र जाहीरनाम्यात या धोरणांवर भर दिला असल्याने त्याला परीक्षार्थीकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र युवक कॉंग्रेस युवकांचा जाहीरनामा ५ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करत असून त्यात बेरोजगारीच्या प्रश्नांचा प्राधान्याने उल्लेख असल्याची माहिती महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.
- अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांच्या कामकाजाबाबत २ हजार लोकांनी नोंदवले अभिप्राय, ९ जुलै असणार आहे अभिप्राय नोंदवण्याची शेवटची संधी
- जवखेडे खालसा येथील मंदिरात पुन्हा आरती केल्यास दर्ग्यावर चादर चढवण्याचा मुस्लिम समाजाचा इशारा
- चोरट्या मार्गाने केली भारतात घुसखोरी, मुंबईत बनवले बनावट आधारकार्ड; अहिल्यानगरमध्ये पकडलेल्या बांग्लादेशींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!
- अहिल्यानगरमध्ये मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल
- श्रीरामपूरमध्ये घरातच बनवत होते बनावट देशी दारू, पोलिसांनी छापा टाकून आरोपींना घेतले ताब्यात