फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या प्रथम क्रमांक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रवरानगर दि २ आक्टोंबर २०१९ –

नुकत्याच कोळपेवाडी येथे पार पडलेल्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या १४ वर्षें वयोगटातील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात पुणे संघावर विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळवून प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या मुलींच्या या संघाने फुटबॉल स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला असून या संघाची राज्यस्तरावर निवड झाली असल्याची माहिती संचालिका सौ.लीलावती सरोदे यांनी दिली. 

विद्यालयाच्या प्राचार्या सौ. कुमकर, क्रीडा संचालिका आणि फुटबॉल कोच सौ. विद्या गाढे-घोरपडे , हॉकी मार्गदर्शक सौ. कल्पना कडू यांच्या मार्गदर्शनाखाली गोलकिपर कु. भावना देशमुख,कु, दीप्ती बर्डे,कु. वैष्णवी काळे,कु. ईश्वरी नरवडे, यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 

तसेच कु. निकिता जाधव,कु. गायत्री बोरुडे, कु. युतिका अहिरे,कु. प्रणिता पगार, कु.तेजल उचित, कु.श्रद्धा मुंढे,कु. ऋतुजा सिनारे, कु. मयुरी लेकुळे, कु. श्रुती पाटील,समृद्धी जंगले,कु. पायल काळखैरे,सरिता आंधळे, तनुजा अहिरे,वैष्णवी मोरे यांच्या संघाने सेमीफायनल मध्ये सोलापूर ग्रामीण संघाचा ५X ० ने पराभव करीत अंतिम सामन्यात पुणे शहराच्या सेंट मेरी संघाबरोबर अटीतटीची लढत देऊन २X० ने पुणे संघावर विजय मिळविला. 

या मुलींचे राज्याचे गृह निर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील,महासंचालक डॉ.यशवंत थोरात,मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, प्रा. दिगंबर खर्डे, प्रा. विजय आहेर यांचेसह शिक्षक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केले.

Leave a Comment