महिला पदाधिकाऱ्याविरोधात अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांविरोधात गुन्हा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संगमनेर: महिला पदाधिकाऱ्याविरोधात अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी (१ ऑक्टोबर) सकाळी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला.

या वेळी शिवसेनेची एक महिला पदाधिकारी या कार्यक्रमासाठी येत असताना जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी महिला पदाधिकारी येत असल्याचे अरगडे यांना सांगितले, यावर संगमनेर पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ धोंडिबा अरगडे यांनी संबधीत महिलेविषयी अश्लिल शब्दप्रयोग करीत शेरेबाजी केली.

संबधित महिलेच्या पतीसह शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही पोलिस ठाण्यात धाव घेत संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संबधित महिलेच्या तक्रारीवरुन नवनाथ अरगडे आणि कातोरे या दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लिलता निर्माण होईल, असे कृत्य आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

Leave a Comment