अखेर नितेश राणे भाजपात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना अखेर गुरुवारी भाजपात प्रवेश देण्यात आला. कणकवलीत भार तीय जनता पार्टीच्या कार्यालयात स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने हा प्रवेश झाला.

आपणदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे नारायण राणे स्वत: सांगत असले तरी त्याबाबत सस्पेन्स मात्र कायम आहे. राणे कुटुंबीयांना भाजपात प्रवेश देण्यास युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. यामुळे आता नितेश राणे यांच्या प्रवेशानं तर शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पक्ष प्रवेश झाला असला तरी भाजपाने नितेश राणे यांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही.नितेश राणे गुरुवारी सकाळी आपल्या शेकडो समर्थकांसह कणकवली येथील भाजपा कार्यालयात आले. तेथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपा सदस्यत्वाचा अर्ज भरून पक्षप्रवेश केला. आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून निष्ठा आणि पक्षाची शिस्त पाळूनच मी आणि माझे सहकारी काम करतील. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार भाजपातील लोकशाहीनुसार येथील कार्यपद्धती आत्मसात करू.

कोकणात भाजपा पुढील काळात नं. १ बनवणार असल्याची पहिली प्रतिक्रिया भाजपा प्रवेशानं तर नितेश राणे यांनी दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, प्रकाश पारकर, संजय कामतेकर, सुरेश सावंत, अभिजित मुसळे, बंड्या मांजरेकर, संतोष पुजारे, संदीप मेस्त्री, ॲड. राजेंद्र परुळेकर, प्रमोद रावराणे, प्रभाकर सावंत, राजश्री धुमाळे आदींसह भाजपा व स्वाभिमानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवली भाजपा कार्यालयात नितेश राणे यांचा प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार हे वृत्त स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना समजताच शेकडो कार्यकर्ते सकाळी ११ वाजल्यापासूनच गोळा झाले होते. नितेश राणे यांचे १२.३६ वाजता भाजपा कार्यालय येथे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. कणकवली विधानसभा मतदारसंघातून आता नितेश राणे यांना भाजपाची उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

Leave a Comment