गॅस टाकीचा स्फोट होवून घर जळाले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहाता : तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथे गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गॅस टाकीचा स्पोट झाला. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे शेजारील घरांचेदेखील नुकसान झाले.

वाकडी येथील पूर्वेस असलेल्या चितळी रोड, शिरगिरे आखाडा भागात पाटबंधारे विभाग हद्दीत राहात असणाऱ्या हौशिराम तुकाराम पगारे यांच्या पत्नीने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास स्वयंपाक करण्यासाठी गॅस पेटविला असता रेग्युलेटरमधुन जाळ निघून गॅस पेट घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यावेळी त्यांनी भयभीत होत लगेचच आरडाओरडा केला. घाईने पाच शेळ्या घराबाहेर घेतल्या. त्यानंतर घरातील इतर संसारोपयोगी वस्तु बाहेर घेण्याचा प्रयत्न सुरू असताना शेजारील लोकांनी त्यांना मज्जाव केला. काही मिनिटांत भडका झालेल्या गॅस टाकीचा भीषण स्पोट झाला. त्यामुळे त्यांच्या घराने पेट घेतला.

स्पोट इतका मोठा होता, की सुमारे दोन किमी परिसरात तीव्रता जानवली. स्पोट झाल्यावर शेजारील लोकसुद्धा दूरवर पळाले. घटनेनंतर कैलास लहारे यांनी गणेश कारखान्यात संपर्क साधत अग्निशामक गाडी बोलावली. त्यानंतर आग विझली; मात्र तोपर्यंत पगारे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले होते. ही आगीची तीव्रता इतकी होती की शेजारील चार घरांचेसुद्धा नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Leave a Comment