उमेदवारांच्या ऐवजी पावसानेच केले शक्तीप्रदर्शन !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर – जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उमेदवारांच्या आनंदावर पाणी फेरले गेले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस होता.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र, अचानक आल्याने पावसाने उमेदवारांचा निरूत्साह झाला. भर पावसात इच्छुकांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. या पावसामुळे शक्तीप्रदर्शनाचा बेत हुकला.

दरम्यान, छत्रपती उदयनराजे भोसले हे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ कर्जतला येणार होते. मात्र, पावसामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत ते कर्जतला आले नव्हते. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र आज दुपारी बारा वाजता अचानक पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. या पावसामुळे इच्छुक उमेदवारांचे नियोजन कोलमडले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ मतदारसंघात मिळून गुरुवारपर्यंत ६९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी गुरुवारी तब्बल ५२ अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी दाखल करण्यास आज अखेरचा दिवस होता.

दि. २७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या उमेदवारी दाखल करण्याच्या प्रक्रियेत पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी नऊ व तिसऱ्या दिवशी सात अर्ज दाखल झाले होते.गुरुवारी चौथ्या दिवशी ५२ अर्ज आले.

अर्ज दाखल करणारांमध्ये वैभव पिचड, डॉ. किरण लहामटे, राधाकृष्ण विखे, स्नेहलता कोल्हे, राजेश परजणे, डॉ. चेतन लोखंडे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, हर्षदा काकडे, शिवाजी कर्डिले, विजय औटी, नीलेश लंके, सुजित झावरे, संदेश कार्ले, रोहित पवार, अनिल राठोड, संग्राम जगताप, बबनराव पाचपुते अशा प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे.

Leave a Comment