अहमदनगर :- भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांची नगर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार इच्छा होती. त्यासाठीची आवश्यक तयारीही त्यांनी केली होती. पक्षाचा ‘एबी’ फॉर्म आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी तसेच खासदार डॉ. सुजय विखेंचे दूत नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंना भेटून अर्ज न भरण्याची सूचना केली आणि वाकळेंची इच्छा ‘थंडावली’. त्यानंतर ‘पक्षादेशानुसार निवडणुकीत काम करणार’, असेही त्यांनी बोलताना सांगितले.

नगरची शिवसेनेकडे असलेली जागा भाजपकडे घेऊन पक्षाकडून येथे उमेदवारी करण्याची मनीषा वाकळे यांच्यासह माजी खासदार दिलीप गांधी, त्यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांची होती.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांनी घरी येऊन त्यांची भेट घेतली व नगरमधून पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरायचा नाही, असा पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्याचे त्यांना सांगितले.
त्यानंतर काही वेळाने नगरचे नवे खासदार डॉ. सुजय विखे यांचे दूत म्हणून नितीन कुंकूलोळ व भंडारी यांनी वाकळेंची भेट घेतली व अर्ज भरू नका, असा डॉ. विखेंचा निरोप असल्याचे स्पष्ट केले. या दोन सूचनांनंतर वाकळेंनी अर्ज दाखल करण्याचा विचार सोडून दिला.
- Post Office च्या 24 महिन्यांच्या एफडी योजनेत 1,00,000 रुपयाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- संगमनेर तालुक्यातील भोजापूर धरण यंदा जून महिन्यातच १०० टक्के भरलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणातून सोडण्यात आले पाणी, धरण ६० टक्के भरल्याची माहिती
- अहिल्यानगरमधील दिंडीतील वारकऱ्यांना चारचाकी वाहनाने दिली जोरदार धडक, पाच वारकरी गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक
- अहिल्यानगरमधील लिंबू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात, लिंबाला मिळाला तीन वर्षांतील सर्वात निचांकी दर