Maharashtra

तिसऱ्यांदा राजळे-ढाकणे राजकीय संघर्ष होणार

शेवगाव-पाथर्डीत तिसऱ्यांदा राजळे-ढाकणे असा राजकीय संघर्ष होणार आहे. दोन्ही बाजूंनी सर्व यंत्रणा पाजळण्यास प्रारंभ झाला आहे. उमेदवारी माघारीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार असले, तरी खरी लढत भाजप विरुध्द राष्ट्रवादी अशीच आहे. विजयाचे सूत्र मात्र माजी आमदार चंद्रशेखर घुले व नरेंद्र घुले यांच्याभोवती फिरणार आहे.

१९८५ मध्ये बबनराव ढाकणे विरुद्ध अप्पासाहेब राजळे अशी लढत होऊन ढाकणेंचा विजय झाला. त्यानंतर २००४ मध्ये राजीव राजळे विरुद्ध प्रताप ढाकणे अशा लढतीत राजळे यांचा विजय झाला. या वर्षीच्या लढतीत मोनिका राजळे विरुध्द प्रताप ढाकणे अशी लढत घुले यांच्या मुत्सद्देगिरीने लागली आहे. गेल्या चाळीस वर्षांचा राजकीय संघर्ष ऐरणीवर येणार असून कार्यकर्तेसुध्दा नेत्यांच्या लढतीसाठी सज्ज झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उमेदवारीसाठी भाजपच्या संपर्कात होते. ढाकणे यांचे समर्थक, तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या दरबारात हजेरी लावून आले. मतदारसंघावर पंकजा मुंडे यांचा प्रभाव असल्याने भाजपकडून उमेदवारी मिळावी, असा प्रयत्न भाजपच्या अनेक इच्छुकांनी केला. माजी आमदार राजीव राजळे यांच्या निधनानंतर आमदार राजळे खंबीरपणे व सक्षमपणे कारभार करू शकणार नाहीत, असे गृहित धरून अनेकांच्या मनात आमदारकी चमकली. स्वपक्षीयांचा असा समज चुकीचा ठरवत आमदार राजळे यांनी दमदारपणे वाटचाल करत राजीव राजळे यांची पोकळी भरून काढली. निष्ठावान म्हणणारे उमेदवारीच्या माध्यमातून उघडे पडले.

पक्षश्रेष्ठी, विशेषतः पंकजा मुंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यामागे पूर्ण ताकद उभी करत पुन्हा संधी दिली. त्यानंतर राजळे विरोधकांनी एकत्र येत आपल्यापैकी एक किंवा खंबीरपणे राजळे यांना विरोध करू शकेल अशा उमेदवारांमागे शकेल अशा उमेदवारामागे शक्ती एकवटणार असली, तरी खरी लढत मात्र राजळे-ढाकणे अशीच होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घुले बंधुवर ढाकणेंच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली असली, तरी घुले यांना मानणारे मतदार किती मतांचे दान ढाकणेंच्या पारड्यात टाकतात यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button