पुद्दुचेरी:- पुद्दुचेरीचे सार्वजनिक बांधकाममंत्री ए. नमासीवायम यांच्या निवासस्थानी बाॅम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने गुरुवारी रात्री पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून नमासीवायम यांच्या निवासस्थानी बाॅम्ब ठेवला असल्याची माहिती दिली होती.
त्यानंतर पोलिसांनी निवासस्थानाची तपासणी केली, पण तेथे काहीही आढळले नाही. बाॅम्बची माहिती खोटी आहे हे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. त्याला गुरुवारी रात्री उशिरा कलपेट भागातून अटक करण्यात आली.

त्याचे नाव भुवनेश (१९) असे असून तो तामिळनाडूच्या विलिप्पुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. भुवनेशने अलीकडेच मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी आणि लोककल्याणमंत्री कांडासामी यांच्या निवासस्थानीही बाॅम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली होती.
- एक-दोन नव्हे तब्बल 15 देशांचा आहे ‘हा’ राष्ट्रीय प्राणी; जाणून घ्या त्याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व!
- सरकारी कर्मचाऱ्यांना सोन्याची लॉटरी! 18000 पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार होणार 50000
- FD विसरा! मिडल क्लास लोकांसाठी ‘या’ आहेत जास्त परतावा देणाऱ्या 10 योजना, जाणून घ्या अधिक
- दर मिनिटाला धावते ट्रेन, भारतातील सर्वात मोठं आणि वर्दळीचे स्टेशन कोणते?, तब्बल 150 वर्षांहून जुने आहे हे स्टेशन!
- घरातील ‘या’ दिशेला असतो शनिदेवाचा वास, इथे चुकूनही 3 कामे करू नका; अन्यथा संकट निश्चित!