Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

प्राजक्त तनपुरेंना मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादाने विरोधक अवाक् !

राहरी :- मतदारसंघ आपला बालेकिल्ला आहे आणि येथे आपण प्रचंड मतांनी विजयी होऊ, असा प्रचार कर्डिले समर्थक करत असताना शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीला मिळालेला प्रचंड अशा प्रतिसादामुळे कर्डिले समर्थक अवाक् झाले आहेत.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरुषांबरोबरच महिलाही स्वयंस्फुर्तीने रॅलीत आल्याने आणि तरुणही मोठ्या प्रमाणावर रॅलीत असल्याने प्राजक्त तनपुरे यांना मिळालेला प्रतिसाद हा कर्डिले समर्थकांसाठी अनपेक्षित असा धक्का देणाराच होता.

राहुरी मतदार संघातून दोनदा विजयी झालेले भाजपाचे आ. शिवाजी कर्डिले यांनी आपण लाखाच्या फरकाने निवडून येव, असे सांगत जणू आपल्यापुढे कोणीही उमेदवार टिकाव धरु शकणार नाही, अशा प्रकारचा आत्मविश्वास व्यक्त केला होता.

त्यामुळे कर्डिले समर्थकही बिनधास्त होते. मात्र शुक्रवारी प्राजक्त तनपुरे यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढली. त्या रॅलीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने विरोधकही चकीत झाले आहेत. प्राजक्त तनपुरे हे राहुरीचे नगराध्यक्ष आहेत. शिवाय कर्डिले यांच्यापेक्षा अत्यंत तरुण आहेत.

मितभाषी असणारे प्राजक्त तनपुरे जेव्हा पहिल्यांदानगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले. तेव्हा जनतेतून ते राहुरीचे नगराध्यक्ष झाले. मा. खा. बापूसाहेब तनपुरे, माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका लढविलेल्या आहेत.

मात्र प्राजक्त तनपुरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरल्याने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे. उमेदवारीअर्ज भरण्याच्या पहिल्याच रॅलीत हजारो लोक अनपेक्षितपणे प्राजक्त तनपुरेंच्या मागे उभे राहिल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता.

कारण कर्डिले यांच्या समर्थकांनी आपणच निवडून येणार, आपल्यासमोर कुणीही तुल्यबळ उमेदवार नाही, अशा अविर्भावात वातावरण निर्मितीला सुरुवात केली होती. मात्र अर्ज भरायच्या पहिल्याच रॅलीत प्राजक्त तनपुरे यांना जो अनपेक्षितपणे मतदारसंघातून प्रतिसाद मिळाला त्यामुळे विरोधकांच्याही भुवया उंचावल्या असेल कारण खुद्द तनपुरे समर्थकांनाही रॅलीला एवढा प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज नव्हता.

याचाच अर्थ राहुरी मतदार संघाची निवडणूक अटीतटीची होणार हे आता स्पष्ट झाले आहे. कारण प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेल्या दौऱ्यातलोक त्यांना भेटून पुन्हा येवू नका, आम्ही तुमच्याच मागे आहोत. दुसरीकडे तुम्ही लक्ष द्या, असे सांगत त्यांना आश्वस्त करत आहेत.

त्यामुळे तनपुरे समर्थकांच्या अपेक्षा आणि मनोबल प्रचंड उंचावले आहे. हे वातावरण असेच पुढे वाढत राहिले तर या ठिकाणी तनपुरेंचे मोठे आव्हान कर्डिलेंपुढे उभे ठाकू शकते, हेही तितकेच खरे!


Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button