अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्हाभरातील पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सुमारे साडेचार हजार व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या सर्व व्यक्तींकडून एका वर्षांसाठी बॉण्ड लिहून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत तीन हजार व्यक्तींनी बॉण्ड लिहून दिले असून उर्वरित व्यक्तींकडून बॉण्ड लिहून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचे धाबे दणाणले आहेत.

दीड वर्षभरापूर्वी घडलेल्या केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर दगडफेक व पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या तब्बल ९०० राडेबाजांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दीडशेपेक्षा अधिक आरोपींना अटकही झाली होती.
न्यायालयीन कोठडीनंतर हे आरोपी सशर्त जामीनावर सुटले. मात्र, पुढील काळात काेणताही अनुचित प्रकार शहरात घडू नये, यासाठी पोलिसांनी या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापैकी अनेकांकडून पुन्हा बॉण्ड घेण्यात आला आहे.
- तुमचंही नाव A, K, M, N, S आणि G अक्षरांनी सुरु होतंय? मग जाणून घ्या तुमच्या स्वभावाचे अद्भुत रहस्य!
- पाकिस्तानातही आहे एक ऐतिहासिक आणि अनोखं शिवमंदिर, भगवान शिवाच्या अश्रूंनी तयार झालेले ‘हे’ सरोवर उलगडते अद्भुत रहस्य!
- अहिल्यानगर शहरात वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल
- कंटाळवाण्या 9 ते 5 च्या नोकरीला करा गुडबाय; ‘हे’ 5 हटके करिअर ऑप्शन्स देतील लाखोंचा पैसा!
- केंद्र सरकारने 500 रुपयांच्या नोटसंदर्भात घेतला अत्यंत धक्कादायक निर्णय?, महत्वाची माहिती समोर!