Ahmednagar CityAhmednagar News

जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त भव्य मॅरेथॉन उपक्रमाचे आयोजन

अहमदनगर :- जागतिक मानसिक  स्वास्थ्य दिनाचे औचित्य साधुन सकारत्मक विचारसरणी साठी भव्य मैराथन उपक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व वयोगटातिल लोक या उपक्रमात सहभागी होउ शकतात.मानसिक आजारा विषयी समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत.

साधारण ताण-तणावापासून निद्रानाश उदासीनता नैराश्य आत्महत्येचे विचार येणे असंबद्ध तर येणे वेडेपणाचे आजार होणे अशा विविध स्वरूपामध्ये समाजामध्ये मानसिक आजारा दिसून येतात. मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये आणि त्याच्या नात्यात नातेवाईकांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड असतो आणि त्यामुळे हा आजार लपवून याकडे लोकांची प्रवृत्ती असते.

या सर्व कारणांमुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे आणि समाजामध्ये विध्वंसक प्रवृत्ती व आत्महत्येचे प्रकार वाढत आहे. याच बरोबर उच्च रक्तदाब मधुमेह व इतर जुनाट प्रवृत्ती चे आजार यांच्याबरोबरच मेंदूमध्ये रासायनिक बदल होऊन असम बद्धता नैराश्य व व्यसनाधीनता इत्यादी विकारांमध्ये वाढ होत आहे.

मानसिक आजार येण्याची शक्यता 25 टक्के लोकांमध्ये आहे व हे प्रमाण हळूहळू वाढत आहे. याचबरोबर मानसिक ताण तणाव नैराश्य व्यसनाधीनता यामुळे त्याचे प्रमाणही वाढत आहे आणि प्रत्येक चाळीस सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करत आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासातून निदर्शनाला आलेले आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करता समाजामध्ये मानसिक आजार व नैराश्य यावर खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती चा तयार केली पाहिजे कोनातून ऑक्टोबर महिन्यामध्ये आरोग्य सप्ताह व त्या अनुषंगाने सर्व समाजामध्ये एक प्रकारची संवेदनशीलता तयार करण्यात यावी असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. यावर्षीचे बोधवाक्य मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवा व आत्महत्येचे प्रमाण घटविण्यास मदत करा असे आहे.

या अनुषंगाने अहमदनगर येथील प्रख्यात साईदीप हॉस्पिटल तर्फे दिनांक 13 ऑक्टोबर रोजी  वॉक फ़ॉर मेंटल हेल्थ हा उपक्रम आयोजित केला आहे. या मध्ये तीन किलोमीटर व पाच किलोमीटर असे दोन टप्पे असून राज्यातील सर्व वयोगटातील लोकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेऊ शकतात. 

मानसिक स्वास्थ्य दिनाचे औचित्य साधुन साईदीप हेल्थकेयर, रामावतार मानधना ट्रस्ट व नरेंद्र फिरोदिया यांच्या नगर रैझिंग फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाणे या मैराथन उपक्रमाचे आयोजन केले आहे.

रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.15 वाजता होणार असून उपक्रमाचे  ठिकान मानधना फार्म फुलारी पेट्रोल पंप जवळ भूतकर वाड़ी, नावनोंदणी  साठी प्रवेशिका साईदीप हॉस्पिटल, येथे उपलब्ध आहे. अशी माहिती डॉ अश्विन झालानी व साईदीप हॉस्पिटल चे चेयरमैन डॉ एस एस दीपक यानी दिली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button