जामखेड : लंकेत सोन्याच्या विटा आहेत. पण त्या तुमच्या कामाच्या नाहीत. त्यामुळे तुम्हाला रामाचे राज्य पाहिजे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे विकासकामे करून मते मागत आहेत. विरोधकांनी काय काम केले? विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ नान्नज (ता. जामखेड) येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. तेथे त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, वीस वर्षे मी तिकडे होते. त्यामुळे तेथील मला माहिती आहे.

आपल्याच माणसाला सुख दु:ख कळतात. या लोकशाहीच्या मोठ्या उत्सावात विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या भावाने (राम शिंदे) पाच वर्षांत मतदारसंघात विविध विकास कामे केली. त्यांची उतराई म्हणून भावाला मदत करा, असे आवाहन त्यांनी केले.
- प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगावर ‘या’ वस्तू अर्पण करा, मिळेल आवडता जोडीदार!
- जग बदलतेय! ‘या’ 10 देशांत नास्तिकांची संख्या झपाट्याने वाढली, भारतातील आकडेवारी चिंताजनक
- तुमचंही नाव A, K, M, N, S आणि G अक्षरांनी सुरु होतंय? मग जाणून घ्या तुमच्या स्वभावाचे अद्भुत रहस्य!
- पाकिस्तानातही आहे एक ऐतिहासिक आणि अनोखं शिवमंदिर, भगवान शिवाच्या अश्रूंनी तयार झालेले ‘हे’ सरोवर उलगडते अद्भुत रहस्य!
- अहिल्यानगर शहरात वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया करणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल