जामखेड | वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण जाधव यांच्या प्रचारार्थ आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा रविवारी (१३ ऑक्टोबर) दुपारी ४ वाजता कर्जत येथील बाजारतळावर होणार असल्याची माहिती कर्जत तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी दिली.
जाधव यांनी वंचित बहुजन जोडो अभियानाच्या माध्यमातून कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व गावांतील कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला आहे. त्यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार १० ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.कर्जतच्या सभेत आंबेडकर काय बोलतात, याकडे तालुक्यातील उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांचे लक्ष लागले आहे.

या सभेसाठी प्रसिद्धीप्रमुख भगवान राऊत, जिल्हा संघटक नंदकुमार गाडे, तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, अरुण डोळस, विशाल पवार, विकास म्हस्के, महेश आखाडे, जावेदभाई पठाण, डॉ. अन्सारभाई शेख, मुबारक सय्यद आदी परिश्रम घेत आहेत.
- वास्तुसंबंधी ‘हे’ उपाय केल्याने भोलेनाथ होतात प्रसन्न, जाणून घ्या श्रावण महिन्यातील विशेष धार्मिक नियम!
- कर्मचाऱ्यांसाठी जणू स्वर्गच आहे ‘हा’ देश! इथे 52 तासांपेक्षा जास्त काम दिल्यास मालकाला होतो तुरुंगवास! मिळणाऱ्या सुविधा ऐकून तर विश्वास बसणार नाही
- केतूच्या प्रभावामुळे भविष्य आधीच ओळखून बसतात ‘हे’ लोक; तुमचाही हाच मूलांक तर नाही?
- महाराष्ट्र राज्यातील ‘या’ शेकडो शाळांना 23 ऑगस्ट 2025 पर्यंत सुट्टी जाहीर ! तुमच्या शाळा सुरू राहणार की बंद ? वाचा…
- महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती देणे बाबत 7 जुलै रोजी शासन निर्णय जारी !