शिर्डी :- मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश थोरात यांनी प्रचार दरम्यान नवीन प्रचाराची शक्कल लढवत कार्यकर्त्यांसह रांजणगांव देशमुख गावात मंदिरातच मुक्काम केला. रांजणगाव देशमुख येथील हनुमान मंदिरात रात्री नागरिकांच्या भेटीगाठी झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार थोरात यांनी तिथेच अंग टाकले.
रात्री गावकऱ्यांनी उमेदवारासर सर्वांना पिठलं भाकरी जेवण दिले. यावेळी नवनाथ महाराज आंधळे, गबाजी खेमनर,अण्णासाहेब थोरात,रामदास काकड उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधतांना थोरात म्हणाले, राहता मतदार संघातील पश्चिम भागासाठी निळवंडेचे कालवे महत्त्वाचे आहेत.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांची कामे काही प्रमाणात मार्गी लावली आहेत. प्रवरा परिसर सुखी राहण्यासाठी राहत्याच्या नेतृत्वाने निळवंडेच्या कालव्यांना विरोध केला. कालवे झाले तर त्याचा फायदा तळेगाव भागास होईल व पिण्याचे पाणी कमी होईल म्हणून तळेगाव भागाला पाणी न मिळू देणाऱ्यांनी राहत्यातील पश्चिम भाग ही वंचित ठेवला.
या कालव्यांना शिर्डी संस्थानचा निधी दिला अशा घोषणा केल्या. त्यातील एक रुपया ही मिळाला नाही.आता ही १७०० कोटी मंजूर झाले म्हणता मग काम का होत नाही. मागील ४ वर्ष निधी देत नाही म्हणून ओरडणारे दोन महिन्यातच निधी देतो म्हणून सरकारचे गोडवे गात आहेत. पक्षबदल जनतेसाठी की सत्तेसाठी हा मोठा प्रश्न मतदारांपुढे पडला आहे.
- अहिल्यानगरमध्ये स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली गुजरातच्या दोन तरूणांना १५ लाखाला गंडवलं, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न?
- 9 जुलै 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अफाट यश ! नशिबाची पूर्ण साथ लाभणार
- SBI तुमच्या घराला देणार आकार ! 40 लाखांचे होम लोन घेणार आहात, मग तुमचा पगार किती हवा ? वाचा…
- सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठा बदल ! 3 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट ; महाराष्ट्रातील 22 आणि 24 कॅरेटचे रेट कसे आहेत?
- चोरट्या मार्गाने केली भारतात घुसखोरी, मुंबईत बनवले बनावट आधारकार्ड; अहिल्यानगरमध्ये पकडलेल्या बांग्लादेशींच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!