Ahmednagar NewsAhmednagar SouthVidhansabha 2019

जगताप-शेलार म्हणजे नटसम्राट व वगसम्राटाची जोडी : मा. मंत्री बबनराव पाचपुते

श्रीगोंदा : पाच वर्षे पोराच्या हातात सत्ता देवून शेतकऱ्यांच्या प्रपंचाचे वाटोळे केले. एकही काम शेतकरी हिताचे झाले नाही. खोटे बोलून शेतकऱ्यांचा बळी दिला आणि अपयश आले म्हणून निवडणूकीतून माघार घेऊन शेलारांना उभे केले.

तालुक्यात जगताप शेलार नटसम्राट व वगसम्राट जोडी तयार झाली आहे. त्याच्या भूलथापांना बळी पडू नका असे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी बोलताना केले. श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे मा.मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ सेवा संस्थेचे अध्यक्ष दिपक नादंगुडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

यावेळी सभेला प्रा.तुकाराम दरेकर, रमेश गिरमकर, नानासाहेब झिटे, विठ्ठलराव काकडे, रंगनाथ बिबे,बशिर काझी,गणेश झिटे,महेश खेडकर, दादा शिर्के, विनोद मखरे, अहमदभाई पिरजादे, मच्छिद्र घोधडे, शहाजी खेडकर, दादा गोरे,

मुन्ना ढवळे,कालिदास ननवरे यांच्या सह मान्यवर हजर होते यावेळी बोलताना ॲड. सुभाष डांगे म्हणाले आमच्या गावच्या पोपटांनी एसटी महामंडाचे संचालक झाल्यानंतर तालुक्यात चालक वाहक म्हणून नोकरी अमिश दाखवून साडेतीनशे तरुणांना गंडा घालुन लाखो रुपये कमविले.

जो माणूस गावात ग्रामपंचायतीला निवडून आला नाही,असे डांगे म्हणाले. प्रास्तविक माजी सरपंच रोहिदास पवार यांनी करुण अहमद पिरजादे यांनी आभार मानले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button