Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingVidhansabha 2019

कोल्हेंच्या विजयाची मशाल पुन्हा रिक्षावालेच पेटविणार

कोपरगाव : या पंचवार्षिकला पुन्हा एकदा आ. स्नेहलता कोल्हे यांना आपण निवडून देऊ. पुन्हा एकदा क्रांतीची मशाल आपल्या हाती येणार आहे.

पुन्हा एकदा विजयाची क्रांती होणार असून, ही क्रांती गोरगरीब रिक्षावाले व सामान्य जनताच करू शकते, असा विश्वास रिक्षा संघटनेचे संस्थापक जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी शनिवारी (दि. १२) रिक्षा संघटना सदस्य व आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यातील संवाद बैठकीत अध्यक्षपदावरून बोलताना केले. प्रस्थापित किंवा पांढरपेशी यांचे हे काम नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राजेंद्र झावरे म्हणाले, आ. कोल्हे तुम्ही तुमच्या कामाचा लेखाजोखा मांडला तो अतिशय मोठ्या प्रमाणात आहे.

मला नाही वाटत कोणत्याच महिला आमदाराने एवढ्या मोठ्या प्रमाणात व विरोधात इतके मोठे काम केले असेल, असे सांगून नव्याने होणाऱ्या सहा पदरी नगर-मनमाड महामार्गावर रिक्षा थांब्यासाठी जागा तसेच नव्याने होत असलेल्या एसटी बस स्टँडमध्ये रिक्षा उभ्या राहण्यासाठी जागा मिळावी जेणेकरून वर्षानुवर्षे स्टॅण्ड बाहेरील मुख्य रस्त्यावर थांबलेल्या रिक्षा आत येतील.

त्यामुळे प्रवासी आणि नागरिक यांचा त्रास कमी होईल. आम्ही सभासदांचा ११३ रुपयांचा वार्षिक विमा त्यांना दोन लाखापर्यंत व वैद्यकीयसाठी तीस हजाराची मदत, असा अल्पसा विमा उतरवतो. आपण जर या कामी मदत केली, तर कमी पैशात जास्त रकमेचा विमा उतरून त्याचा लाभ सभासदांच्या वारसांना होईल, अशा मागण्या त्यांनी यावेळी आमदार कोल्हे यांच्याकडे केल्या.

प्रास्ताविकात संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र सालकर यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा देताना संघटनेच्या सभासदांची शिस्त, सचोटी व काम करण्याची पद्धत याविषयी माहिती दिली.

अध्यक्ष कैलास जाधव यांनी स्वागत करताना रिक्षा व मिनीडोअरसाठी आकारण्यात येणारा विमा अवास्तव आहे. तो रिक्षा व्यवसायाची परिस्थिती पाहता वार्षिक विमा भरणे डोईजड होत आहे. तेव्हा परिवहन मंर्त्यांशी चर्चा करून यासंदर्भातही सभासदांना न्याय मिळावा, अशी मागणी जाधव यांनी केली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button