Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingVidhansabha 2019

सेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत इनकमिंग

कोपरगाव : उच्चशिक्षित शांत, सरळ, संयमी व वेळप्रसंगी जनतेच्या हक्कासाठी पेटून उठणारे नेतृत्व आशुतोष काळे यांच्यावर विश्वास ठेवून ज्येष्ठांपासून ते युवा शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढले आहे.

आशुतोष काळे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या न्यायहक्कासाठी पुकारलेला ऐतिहासिक संप तालुक्याच्या आमदारांनी मोडून सरसकट कर्जमाफीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आजही मतदारसंघातील शेतकऱ्यांना आपल्या न्यायहक्कासाठी उपोषणाला बसावे लागते.

ही दुर्दैवाची गोष्ट असून, आपण मला संधी द्या, मी शेतकऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ येवू देणार नाही, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे. मढी खुर्द येथील अनेक शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी युवानेते आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यामध्ये उत्तर नगर युवासेना उपजिल्हा प्रमुख आबासाहेब आभाळे, कैलास गवळी (माजी उपसरपंच), ज्ञानदेव माळी (माजी सरपंच), सतिश गवळी, सौरभ गवळी, ऋषिकेश आभाळे, प्रकाश माळी, श्रीमती नंदाताई सोनवणे (ग्रा. पं. सदस्य) यांचा समावेश आहे.

चासनळी येथील कोल्हे गटाचे अनेक वर्षापासूनचे निष्ठावान कार्यकर्ते शिवदत्त गाडे तसेच कैलास लकारे, विलास लकारे, काशिनाथ सूरभैया, विठ्ठल सूरभैया, अजय सूरभैया, अक्षय सूरभैया, विकास लकारे, वैभव लकारे, जमन घटे, शांताराम बिरुटे, शाम डहारे, गोरख घटे,

नीलेश पगारे, शिवाजी कांबळे, अविनाश कांबळे, प्रदीप सूरभैया, बालू सूरभैया, नाना पगारे, वसंत पगारे यांचा सामावेश आहे. तसेच रांजणगाव देशमुख येथील अनिल वर्पे, सुनील वर्पे, सीताराम वर्पे, गीताराम वर्पे, वैभव खालकर, नीलेश खालकर, नीलेश गोर्डे, संदीप गुडघे,

गजानन सरोदे, दीपक चव्हाण, नवनाथ कोते, महेश वर्पे, किरण सोनवणे, सचिन खालकर, नानासाहेब वर्पे, अशोक खालकर, प्रसाद वर्पे, सिद्धार्थ वर्पे, नवनाथ वर्पे, पिनू गोर्डे, नवनाथ गोर्डे, सुयोग शिंदे, विकास भागवत, नितीन गोर्डे, दत्तू बनकर, प्रवीण सहाणे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button