शेवगाव / हातगाव : शेतकऱ्यांचे वाटोळे केले, भूलथापा देऊन शेतकरी व जनतेच्या विरोधात निर्णय घेणाऱ्या महायुतीला आता धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वाCयांनी केले. खा. पवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाआघाडीचे उमेदवार ॲड.प्रतापराव ढाकणे यांचे प्रचारार्थ बोधेगाव (ता.शेवगाव) येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे हे होते.
ख. पवार पुढे म्हणाले की, महायुतीने गत विधानसभा निवडणूकीत राज्यातील शेतकरी व जनतेला अनेक प्रकारे भूलथापा देऊन पाच वर्ष सत्ता मिळवून महाराष्ट्राची वाट लावली. सरकारने अरबी समुद्रातील शिवस्मारक व इंदूमिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांची फक्त भूमीपूजने करून दोन्ही स्मारकाला एक वीट ही लावली नाही.

राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद करून हजारो तरुणांना बेरोजगार केले. मी केंद्रात मंत्री असताना ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. परंतु राज्यातील महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची फक्त घोषणा केली असून, कर्जमाफी न झाल्याने राज्यात १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. याला जबाबदर कोण ? असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी आता सत्ता परिवर्तन करणे ही काळाची गरज आहे.
भाजप-युती सरकारने फक्त श्रीमंत उद्योजक व व्यावसायीकांच्या बाजूने निर्णय घेतले असल्याचे म्हटले आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण देऊन विविध ठिकाणी काम करण्याची संधी निर्माण करून दिली. सध्या विरोधक माझ्या नावाचा जप करत असून या निवडणुकीत कलम ३७० चा मुद्दा पुढे करून जनतेचे मत विचलित करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याची टीका केली.
- बँकेपेक्षा जास्त परतावा देतो” म्हणत शेअर मार्केटच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक
- शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळणे अभिमानास्पद ! मंत्री विखे पाटील यांचे गौरवोद्गार
- खाटूश्याम आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! 14 जुलैपासून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?
- निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सुटणार : आ. कर्डिले
- जिथे रावणाचे विचार होते तिथे वारकऱ्यांमुळे प्रभू रामांच्या विचारांची पेरणी : आमदार डॉ. किरण लहामटे