श्रीगोंदा – देशात भाजपचे सरकार आहे. ज्यांचे सरकार येणार नाही त्यांना मतदान करून घाटे का सौदा करू नका, त्यांचे घड्याळ बंद आहे.सत्तेच्या माध्यमातून तिजोरी भरली त्याच वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची वेळ संपली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी श्रीगोंदा येथे जाहीर सभेत बोलताना केले आहे.
श्रीगोंदा येथे महायुतीचे उमेदवारच्या प्रचार सभेसाठी आयोजित सभेत इराणी बोलत होत्या. त्यांनी नागवडे आणि पाचपुते हे समाजाच्या कल्याणासाठी एकत्र आल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते पाण्याबाबत काय म्हणाले होते याची आठवण आहे का? असे विचारत अजित पवार यांना टोला मारत पाण्याची मागणी केल्यावर केलेल्या मावळच्या गोळी बाराची आठवण करून दिली.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ मुक्त होत असल्याने सांगितले यावेळी आमदार सुरेश धस, खासदार सुजय विखे, माजी खासदार दिलीप गांधी, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदींची भाषण झाले.
- पैशांचा अक्षरश: पाऊस पडेल, वास्तुशास्त्रात सांगितलेले ‘हे’ उपाय एकदा करून तर बघा!
- जगातील सर्वात महाग मांस मिळतं ‘या’ देशात, किंमत ऐकून थक्क व्हाल! भारतातही वाढलीये याची जबरदस्त मागणी
- हिमाचल प्रदेश विनाशाच्या दारात?, 100 वर्षांत इतका धोकादायक बदल झाला की…, सत्य ऐकून थरकाप उडेल!
- 70% मुस्लिम समुदाय असूनही ‘या’ देशात हिजाब-बुरख्यावर बंदी, महिलांनी नियम तोडल्यास मिळते शिक्षा!
- DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकार किती पगार देते? आकडा ऐकून थक्क व्हाल!