शिवसेना प्रत्येकाच्या मनात भिनलेली

Published on -

नगर :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन सर्वांना सोबत घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. चांगला विचार करायचा, हसत – खेळत जीवन जगायचे, अनिल राठोड यांनी जसा विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, तसाच शिवसेनेने सुद्धा कधी तडा जाऊ दिला नाही. 

म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेना रुजली पाहिजे. शिवसेना आज नाही, तर अनेक वर्षांपासूनची आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये ती भिनलेली आहे, असे प्रतिपादन सुचिता परदेशी यांनी केले. नगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ राठोड समाजाच्या महिलांनी बाजारपेठेतून रॅली काढून नागरिकांशी संवाद साधला. 

या रॅलीची सुरुवात नेता सुभाष चौक येथून करण्यात आली. तसेच तेलीखुंट, कापडबाजार, भिंगारवाला चौक, नवीपेठ या भागातील दुकानदार, नागरिकांशी राठोड यांनी संवाद साधला. सुचिता परदेशी म्हणाल्या,

आज अनिल राठोड यांच्यासारखे अनेक शिवसैनिक पदाधिकारी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडत आहेत. अनेकांना कधी पदे मिळाली नाहीत. मात्र, त्यांनी कधी भगव्याची साथ सोडली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!